आवाज

  • 3.5k
  • 1.2k

आवाज लेखक : मिलिन्द गीता रामदास राणे बऱ्याचदा आपला अंदाज असा असतो की काही गोष्टी दुसऱ्यांच्या बाबतीत घडतील. पण नेमक्या त्या नकोश्या वाटण्याऱ्या गोष्टी आपल्याच बाबतीत घडतात तेव्हा मात्र होणारा आघात बऱ्याचदा सहन करण्याच्या पलीकडचा असू शकतो . माझ्या बाबतीत हि आता असच घडतंय……….. मी आज संध्याकाळी कामा वरून आलो . रोजच्या सारखा . फ्रेश होउन चहा पिउन मी आमच्या पोटमाळ्यावर बसायला गेलो . आम्ही बैठ्या चाळीत राहतो . जागा दहा बाय दहा ची आहे . त्या मुळे चाळीतल्या लोकांनी बसण्या झोपण्यासाठी खोलीच्या आत पोटमाळे बनवून घेतले आहेत . आमचा पोट माळा म्हणजे माझ्या साठी माझा छोटासा बेडरूमच आहे