आघात - एक प्रेम कथा - 10

  • 6.5k
  • 2.5k

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (10) ‘‘ठीक आहे! तुला जसं वाटतंय तसं तू वागू शकतोस. आमचं काही मत नाही. आम्ही जे योग्य आहे ते तुला सांगण्याचा आणि तुझी चूक तुला दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तुझ्या या भोळया स्वभावाचा ती गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करते आहे. तू जरी जाणूनबुजून कोणती चूक केली नसलीस तरी नकळत तुझ्या हातून चूक घडत आहे. इथून पुढं कसं वागायचं ते तुझं तू ठरवं.’’ ‘‘बसं कर आता अनिल, खूप झालं तु चं बोलणं. इथून पुढं मला काहीच सांगण्याचा अगर माझी चूक काढण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही. मी कसं वागायचं, कसं रहायचं हे माझं मी बघतो. तुमचा आणि