आघात !!

  • 4.1k
  • 1
  • 1.2k

आघात DK ...DK ...DK !!! दिपक केळकरच्या नावाने संपूर्ण हॉल गजबजून गेला होता. शरीरसौष्ठवाच्या अंतिम फेरीत दिपक पोजिंग करीत होता. अतिश्यय पिळदार आणि सुडोल शरीर कमावलेला दिपक सर्व स्पर्धकांमधून उठून दिसत होता. आकर्षक शरीर आणि तितक्याच प्रचंड ताकदीचा मालक दिपक जेव्हा स्टेजवर आला, तेव्हा प्रतिस्पर्ध्यांच्या उरात धडकी भरली. सर्वांना वाटले कि, हि स्पर्धा पण दिपकच जिंकणार. स्टेजवर येऊन दिपकने प्रेक्षकांना आणि पंचांना नमस्कार केला आणि पोजिंगला सुरुवात केली. दोन-तीन पोज झाल्या असतील आणि दिपकची नजर प्रेक्षकांत बसलेल्या एका व्यक्तीवर गेली. अतिशय कृष, विद्रुप, हाडकुळी, गालाची हाडे वर आलेली, चेहऱ्यावर मास नसल्याने बाहेर आलेले भयाण डोळे अशी