आघात - एक प्रेम कथा - 12

  • 6.1k
  • 2k

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (12) ‘‘असं रडायला काय झालं? कारण तरी समजले का मला?’’ ‘‘प्रशांत, सुमैयानं माझ्याशी भांडण काढलं.’’ ‘‘का? कशासाठी?’’ ‘‘तसं दुसरं तिसरं काहीच कारण नाही.’’ ‘‘मग कारण आहे तरी काय?’’ ‘‘तुझं आणि माझं बोलणं.” “म्हणजे?” ‘‘तिचं मत आहे, मी तुझ्याशी बोलू नये अथवा मैत्री करू नये.’’ ‘‘का पण?’’ ‘‘देव जाणे! तिच्या मनात काय पाप आहे ते?’’ ‘‘तुला आणखी काही म्हणत होती काय?’’ ‘‘हो. पुन्हा त्याच्या नादी लागशील तर परिणाम वाईट होतील,अशी धमकी देऊन गेली.” “सुमैया आणि धमकी देणं शक्य नाही.” “शक्य आहे हे प्रशांत! तिनं चारचौघात मला तसं बोललीयं.” सुमैयाचा मला खूप राग आला होता. मी