पावबाबाचा शाप!---वेताळ कथा

  • 6.5k
  • 1.4k

नाना झिपऱ्या म्हणजे, आडवं डोकं होत! सरळ साधी गोष्ट सुद्धा, वाकड्या मार्गाने करण्यात, याला काय आनंद मिळतो, ते त्यालाच माहित. पण झिपऱ्या हा एक जिवंत माणूस आहे, आणि जिवंत माणसाला अनंत इच्छा असतात. झिपऱ्याला पण आहेत. त्याच्या स्वभावाप्रमाणे, त्याने प्रामाणिक कष्टाच्या मार्गा ऐवजी, वाकडा मार्ग निवडला होता. आपल्या असणाऱ्या आणि भविष्यात उदभवणाऱ्या, सगळ्याच इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्याला एकच 'सुपर वर' हवा होता! 'वेताळ' प्रसन्न करून, त्याच्या कडून हवा असलेला 'वर' मागून घेण्याचा झिपऱ्याने घाट घातलाआणि आता झेंगट होऊन बसलं. वेताळाला खांद्यावर घेऊन झिपऱ्याला, दर आमोशाला स्मशानापर्यंत 'मौने'च न्यावं लागतंय! समजा एखाद्या आवसेला झिपऱ्याने वेताळाच्या 'ठाण्याला' दांडी मारली, तर---तर वेताळ,