आघात - एक प्रेम कथा - 20

(12)
  • 4.8k
  • 2
  • 2k

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (20) ‘‘अरे पण तू तर तिला मैत्रीण मानत होतास. तिच्याबरोबरच्या प्रेमाला तुझा विरोध होता, तिच्याबाबत वाईट बोललं तरी तुला राग यायचा. तिची मैत्री शुद्ध आहे. तिच्या मनात एकतर्फी प्रेम नाही असं तूच म्हणत होतास पण असा अचानक कसा काय बदललास तू? अशी काय जादू केली तिनं तुझ्यावर? तू सारं विसरून जावी अशी!’’ ‘‘याचं उत्तर देणं कठीण आहे सुरेश. पण तू माझा जिवाभावाचा मित्र आहेस म्हणून सांगतो. पण तू कुणाला सांगणार नाहीस असे वचन दे मला.” “हो.सांग.” ‘‘सुरेश त्या रविवारच्या रात्री मला सुमैयाने भेटायला बोलविले होते. नाही आलास तर जीवाला काहीतरी करुन घेईन असं लिहिलं