एक प्रवास असाही

  • 5.4k
  • 1.3k

हसेल माझ्यावर जर मी माझा प्रवास कुणाला सांगितला तर, काही नाही झाडापासून ते जमीनीपर्यंतचा प्रवास माझा.. किती असावं ते अंतर तरी... कधी वय झालं म्हणून, हळुवारपणे हवेच्या तालावर नाचत जमिनीवर येऊन पडायचं, कुणाचा पाय पडत नाही तोवर माझ्यावर अंत्यसंस्कारच होणार नाही, अस समजायचं. तेव्हापासून निपचित पडून कुणाचा पाय पडेल म्हणून वाट बघत बसायचं... मला वाटलं माझा एवढाच असतो प्रवास, पण एकेदिवशी एक नवीन प्रकार घडला माझ्यासोबत, एव्हाना वर्षानुवर्षे माझा चुराडा व्हायचा, माझ्या शरीराचे अगणित तुकडे वाऱ्यासंगे वाहायचे इकडून तिकडे. चोहीकडे सुबन्ध दरवळत फिरायचे ते.