दोन ललित

  • 3.1k
  • 1.1k

दोन ललित लेख- १. लेखनाची अवजारे . २. आठवणींचे महाकाव्य ..आई ..! ---------------------------------------------------------------- १. लेखनाचीअवजारे मित्र हो - प्रत्येक कारागीर माणूस त्याच्या कामासाठी त्याला जी अवजारे लागत असतात ते ठेवण्यासाठी त्याची एक खास विशेष संदुक असते, पेटी असते ,बॉक्स असतो, धोपटी असते, ब्रीफकेस असते, आणि आता या नव्या काळाची खुण म्हणता येईल अशी सॅक असते. ही अवजारे ज्यात असतात त्या बॅग, पेट्या, ऑफिस बॅग ही त्या त्या कारागिरांची ट्रेडमार्क म्हणता येईल अशीओळख असते. कलावन्त सुद्धा एक कारागीर मानला जातो, लेखनास पूरक असे जे जे काही, सर्व काही , त्याला लेखन अवजारे असे ठळकपणे म्हणणे अधिक योग्य ठरावे. व्यक्ती तितक्या