मायेची ओढ

  • 8.4k
  • 1.9k

मायेची ओढकमला दहा वर्षाची पोर. तिला घरातील लोकांसोबत इतर गोष्टीवर देखील खूप प्रेम होतं. तिचे वडील शेतकरी होते तर आई सुद्धा वडिलांसोबत शेतात काम करत असे. तिला एक छोटा भाऊ देखील होता. या सर्वांसोबत घरात एक चार-पाच कोंबड्या, मांजर, कुत्रा, गाय, बैल असे प्राणी देखील होते. त्या सर्व प्राण्यांवर कमलाचा खूप जीव होता. विशेष करून हंमा गायीवर तिचे खूप प्रेम होते. कारण हंमा ही तिची दुसरी आईच होती. जेंव्हा तिचा जन्म झाला होता. तेंव्हा हंमा घरात आली होती आपल्या लहान पिलासह. कारण ही तसेच होते. कमलाच्या जन्मावेळी तिची आई खूपच आजारी असायची त्यामुळे कमलाचे पोट भरत नसे. तिची दुधाची तहान