इमानदार कुत्रा

  • 15k
  • 3.1k

इमानदार कुत्राआज गावात गंगाराम आणि त्याच्या इमानदार कुत्र्यांचीच जो तो चर्चा करत होते. कुत्र्याच्या मरणाच्या दिवशी त्याच्या इमानदारीची चर्चा चालू होती. प्रत्यक्ष जीवनात मानवाचे सुद्धा असेच होते नाही का ? अंत्ययात्रेत जाणारे लोकं मेलेल्या माणसाच्या भल्या बुऱ्या गोष्टीवरच तर बोलताना दिसून येतात. अगदी तशीच चर्चा आज मोत्या या कुत्र्याची चालू होती. त्याची एक ही वाईट सवय नव्हती म्हणून तर जो तो त्याची चांगल्या गुणांची चर्चा करीत होते. मोत्या खूप प्रामाणिक, इमानदार आणि विश्वासू होता. त्याने कधी कुणाला त्रास दिला नाही. कुणाच्या घरात जाऊन भाकर चोरली नाही. गंगारामवर त्याचा लई जीव होता म्हणून तर त्याच्या तेराव्या दिवशी तो ही गेला त्याच्याजवळ.