मित्रांची मैत्री

  • 7.6k
  • 1.7k

मित्रांची मैत्रीसुरेश आणि रमेश दोघे जिवलग मित्र होते. त्यांचे घर जवळ जवळ नव्हते मात्र अधून मधून ते दोघे एकमेकांच्या घरी नेहमी येत असत आणि जात असत. त्यामुळे रमेशच्या घरातील सर्वच जण सुरेशला ओळखत होते तर सुरेशच्या घरातील सर्वचजण रमेशला ओळखत होते. त्यांच्या मैत्रीची कहाणी संपूर्ण गावाला माहीत होती. जिथे रमेश तिथे सुरेश हे ठरलेले समीकरण होते. दोघे ही एकाच शाळेत आणि एकाच वर्गात शिकत होते. मिळून अभ्यास करणे, मिळून शाळेला जाणे, मिळून खेळणे सारं काही त्यांचे मिळून मिसळून होत होते. दिवाळी व उन्हाळी सुट्टीच्या काळात त्यांची ताटातूट होत असे तरी ते एकमेकांना फोन करून दिवसातून एकदा तरी बोलत असे. असे