खोडकर कृष्णा

  • 4.9k
  • 951

त्याचं नाव कृष्णा होतं. नावाप्रमाणे तो नटखट आणि खोडकर होता. दिसायला देखील कृष्णासारखा सावळा होता. दुसऱ्याची खोड करण्याची त्याला वाईट सवय होती. त्याच्या या सवयीला सारेचजण कंटाळले होते. त्याच्यावर कोणताच उपाय काम करत नव्हता. घरातील आईवडील, शेजारचे आणि शाळेतील शिक्षक सारेचजण त्याच्या खोड्यापुढे हतबल झाली होती. वर्गाचे बाहेर ठेवलेले चप्पल बाजूला फेकून देणे, दुसऱ्याचे दप्तर लपवून ठेवणे असे अनेक खोड्या करण्यास तो पुढे असायचा. मात्र कोणाची वस्तू चोरण्याची सवय त्याला नव्हती. त्याच्या जीवनात काळे गुरुजीने प्रवेश केला आणि त्या खोडकर कृष्णाचे रूपांतर प्रेमळ कृष्णामध्ये झाले. अशक्य वाटणारी गोष्ट काळे गुरुजींनी शक्य करून दाखविली. शाळेत आल्याबरोबर कृष्णाच्या अनेक करामती पाहून काळे