स्पर्श - अनोखे रूप हे (भाग 16)

(16)
  • 6.8k
  • 3.2k

आज नित्याला अनुने भेटायला बोलावलं होतं त्यामुळे तिने सकाळी लवकरच उठून स्वयंपाक आवरून घेतला होता ..आईचा तोंडाचा पट्टा तसाच सुरू होता पण तिच्याकडे दुर्लक्ष करत ती तयार होऊन साडे दहाच्या सुमारास घरातून बाहेर पडली ..अनुने तिला बाहेर एका हॉटेल मध्ये ठीक 11 वाजता बोलावले होते ..त्यामुळे घाई करत करत ती तिथे पोहोचली ..तशी अनु फार उशिरा येत असे पण नित्या पोहोचताच तिच्या लक्षात आलं की आज अनु तिच्या आधीच तिथे पोहोचली आहे ..अनुला पाहताच नित्याने तिला मिठीत घेतले ..पण आज का कळेना अनु खुश नव्हती ..नित्याला ते जाणवलं पण ती काहीच बोलली नाही ..अनु काहीच ऑर्डर देत नाही हे पाहून