स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 18 )

(15)
  • 9.1k
  • 2.9k

नित्या टोपल्यातला राख झालेला कचरा उचलत म्हणाली , " तुम्ही माझे कागदपत्र जाळले ..माझी आयुष्यभराची कमाई जाळून टाकलीत आणि वरून काहीच न झाल्यासारखं हसत आहात ? तुम्हाला काहीच कस वाटत नाही ..नक्कीच माणसातच जन्म घेतला आहात ना की जनावर आहात ? " नित्याचे बाबा ओरडत तिच्यावर म्हणाले , " तुला काल म्हणलो होतो ना काहीही झालं तरी तुला या घराबाहेर नौकरी करण्यासाठी पाऊल टाकता येणार नाही ..मग मी माझा शब्द पूर्ण केला ..तुला जनावर समजायचं तर तस समज पण तू आमची इज्जत घालवायला निघाली होतीस तेव्हा लोकांनी काय विचार केला असता की आम्ही तुला सांभाळू शकत नाही ..आता बसशील बघ