काकस्पर्श

  • 12.1k
  • 1.6k

नाना ओ नाना !!! हे घ्या केलीच पान, वड्याचा पिट, तांदुल आन मिटाई आजून काय हवा तर सांगा मी हाय येक घंटा हितच...त्या बाजूच्या बंगल्यातल्या काकूंच्या कडेपन असेच हाय उद्या...त्यासनी पन घेऊन यायचा हाय सगला.... बस बस रंग्या तू चहा घे मी टाकतोय माझ्यासाठी... असे म्हणत नाना आणलेल्या पिशव्या माजघरात घेऊन गेले...अरे रंग्या मोगऱ्याच्या गजरा राहिला रे...नंतर आणशील का?? व्हय अंतू अंतू...अन नाना माझ्या बाईला कदी यायचाय उद्या? येउदे रे १२- १२.३० पर्यंत....नाना वय वर्ष ७१ सडपातळ बांधा, सम्पूर्ण पांढरे केस, गोरेपान अन तपकिरी घारे डोळे...सुभाष त्यांचा एकुलता एक मुलगा आणि अमृता त्यांची सून दोघे नोकरीला गेले की नाना अन त्यांचे राज्य