घोडचूक

  • 3.9k
  • 1.3k

विजयची घराची परिस्थिती फारच बेताची. घरात आई वडील आणि दोन बहिणीसोबत तो राहायचा. घरात तोच मोठा असल्यामुळे आई बाबांच्या कामात त्यालाच मदत करावी लागत असे. गावात सातवी पर्यंत शाळा होती म्हणून सातव्या वर्गापर्यंत तो शिक्षण पूर्ण केला. त्यापुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जाणे त्याला शक्य नव्हते. म्हणून तो आपले शिक्षण सोडून देऊन गावात मिळेल ते काम करू लागला. गावात जास्तीत जास्त बांधकाम करण्याचे काम केल्या जात असत त्यामुळे तेच काम विजय करू लागला. हळूहळू तो त्या कामात मजुरदार वरून मिस्त्रीचे काम करू लागला. त्याच्या हातात बऱ्यापैकी पैसा खेळू लागला होता. पण घरात दोन बहिणी असल्यामुळे त्यांच्या लग्नाची चिंता आई बाबांना खात होती.