कपाशीचा पाऊस...

  • 5.3k
  • 1.4k

' काळ्या मेघाराजाने आभाळात दाटी-वाटी केली होती. वारा भिरभिर घिरट्या घालत होता. फक्त एका थेंबाच्या प्रतिक्षेत कुठेतरी एखादा चुकार चातकपक्षी आवासून आशेने नभाकडे टक लावून होता. शेवरीच्या झाडाची बोंड आता चांगलीच तयार झाली. त्यातून निघणार्या सफेद म्हातार्या गोल-गोल भिंगर्या घालत स्वच्छंद विहार करत होत्या. लहानपणी आम्ही त्यांनाच कपाशी समजायचो, आणि ही कपाशी म्हणजे कापसासारखी दिसणारी म्हातारी जेव्हा वार्याबरोबर उडायची, तेव्हा जो पहीला पाऊस यायचा त्याला म्हणायचो, 'कपाशीचा पाऊस'.'कपाशीचा पाऊस'... वीज चमकावी तसं काहीस मला झालं. नको तो कपाशीचा पाऊस. नकोच त्या आठवणी. कधी काळी चिंब कोसळलेल्या त्या पावसाने पार भिजवून टाकल या मनाला, एवढं की आता भिती वाटते याची. ' ‘पाऊस