मी एक पुरुष

  • 5.2k
  • 1.3k

मी एक पुरुष. माझा जन्म पुरुष योनीत झाला आणि समाज मला पुरुष म्हणून ओळखू लागला. मी लहानाचा मोठा होऊ लागलो. समाज मला माझ्या कामाची जाणीव करून देऊ लागली. हे काम तुझे नाही, तू हे काम करू नये, अश्या प्रकारचे सल्ले देऊ लागले. त्यामुळे माझी काय काय कामे आहेत ? मी काय करावे ? हे मला कळु लागले. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी संपूर्ण घर डोक्यावर घेऊ लागलो. चॉकलेट, बिस्कीट किंवा हव्या असलेल्या वस्तुची मागणी रडून का होईना पूर्ण करून घेऊ लागलो. तरी सुध्दा मला प्रसाद म्हणजे मार मिळत नव्हता कारण घराचा मीच एकमेव कुलदीपक होतो. माझ्यशिवाय वंश कसे पुढे जाईल