वृद्धाश्रमातलं प्रेम - 6

  • 7.2k
  • 2.3k

भाग – ६ “चला, आपण लायब्ररीत जाऊ. मी सांगते तुम्हाला सर्व.” असं म्हणून ती उठली आणि निघाली. मला लायब्ररी माहिती नसल्यामुळे मी तिच्या मागे जाणं भाग होतं. चालता चालता तिच्यासोबत केव्हा चालायला लागलो हे कळलं देखील नाही. तिच्यासोबत असं शांतपणे चालताना कसंतरीच वाटत होतं आणि पहिल्या दिवसापासून ती मला मदत करत होती. आतसुद्धा तिचं काम नसताना माझी मदत म्हणून ती येत होती. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने काहीतरी बोलणं भाग होतं. म्हणून मी विचारलं, “तुमचे बाबा कुठं असतात? काल तुम्ही डबा द्यायला गेला होतात म्हणून विचारलं.” “बाबा पोलिसांत आहेत. दगडूशेठ गणपतीच्या बाजूला जिथं पोलिस चौकी आहे ना, तिथं इन्स्पेक्टर आहेत ते.” तिच्या