तू_ही_रे_माझा_मितवा... - 3

(5.3k)
  • 16.6k
  • 1
  • 9.1k

#तू_ही_रे_माझा_मितवा...????#भाग_३आज तनु आणि प्रियाने कामानिमित्त रात्री उशिरा येण्याची परवानगी घेतली असल्याने ऋतू एकटीच होती रूमवर. फ्रेश होऊन ती बाल्कनीत कॉफी घेऊन बसली.रेवाच्या वाक्याने तिचं मन दुखावलं गेलं होतं,डोळे पाणावले होते. तनु आणि प्रिया कामात असल्याने त्यांना फोन करायचा प्रश्नच नव्हता. मनातलं सांगावं इतकं जवळ आतापर्यंत बाकी इतर मित्रमैत्रिणी असं कुणीच नव्हतं...रूममधली शांतता अंगावर येत होती. खालून फक्त काही लहान मुलांच्या खेळण्याचा आवाज शांततेवर ओरखडा पाडत होता, एरवी दंगामस्ती करत ही कातरवेळ कशी निघून जाते ते कळतही नसे पण आज जणू संध्याकाळ अंगावर येत होती. खोल खोल काहीतरी दुखावलं आहे आणि नेमकं सल काय आहे हे न कळल्याने अजूनच तिचे डोळे भरून येत