अनभिज्ञ.

  • 6.1k
  • 2.1k

लाल रंगाची स्विफ्ट डिझायर रस्त्यावर वेगाने धावत होती. मात्र, संध्याकाळच्या गर्दीमुळे अपेक्षित वेग तिला पकडता येत नव्हता. मिळेल त्या चिंचोळ्या जागेतून चालक त्याचं कसब पणाला लावून गाडी खेचत होता. कोणत्याही परिस्थितीत त्याला पंधरा मिनिटात दवाखाना गाठण्याशिवाय पर्यायच नव्हता. चौकातून पुढे ट्रॅफिकची भलीमोठी रांग जबडा वासून येणाऱ्या वाहनांना गिळत होती. गर्दीत एकदा का गाडी शिरली तर वीस मिनिटांचा रस्ता कापायला अर्धा-पाऊण तास लागणार होता. थोडीशी जागा मिळाली तशी ती स्विफ्ट बीआरटी मार्गात शिरली. आता तिच्यावर असणारा ट्रॅफिक चा अंकुश सुटला होता. . . ट्रॅफिक मध्ये असतानाही संयमाने गाडी चालवणारा सुरज आज असंयमी झालेला होता. '५५ किमी प्रतितास' त्याने