शेवटचा क्षण - भाग 8

  • 8.6k
  • 1
  • 4.1k

दिवाळीची पूजा आटोपली... दोघेही तिथेच राहत असलेला गौरवचा मित्र आशिष त्याला भेटले , त्याला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात.. आणि त्याच्याकडून दोघांचे छान फोटो काढून घेतलेत.. काही गौरव बरोबर तर काही गौरवच्या आईबाबांबरोबर, काही पूजा करताना , रांगोळी काढताना, दिवे लावताना असे बरेच वेगवेगळ्या पोज मधले फोटो काढून झाल्यावर त्यांचं फोटो सेशन संपलं.. सगळ्यांनी जेवण केलेत आणि थोडावेळ गप्पा मारून सगळे झोपी गेले.. गौरवला मात्र झोप येत नव्हती.. फोटो काढताना गार्गीचा झालेला स्पर्श आठवून तो मनातल्या मनात आनंदी होत होता.. आणखी विशेष म्हणजे एरवी ती त्याच्यापासून लांब पळायची पण आज गार्गीने कुठलाच विरोध केला नाही.. त्याने पटकन मोबाइल हातात घेतला आणि आज