शेवटचा क्षण - Novels
by Pradnya Narkhede
in
Marathi Novel Episodes
आज गार्गी खूप छान तयार होत होती.. पुन्हा पुन्हा आरश्यात स्वतःलाच बघून कधी लाजत होती तर कधी तिच्या या वेडेपणावर हसतही होती.. नेहमी अगदी साधी राहणारी गार्गी आज मात्र पूर्ण मेकअप करत होती.. कारणही तसंच होतं.. तिच्या बालमैत्रिणीच आज ...Read Moreहोतं.. घरच्यांनाही तिला चांगली तयार हो म्हणूनच सांगितलं कारण आता गार्गीच ही लग्न करायचं होतं आणि अश्या लग्नातच लोक बघतात आणि मग संबंध जुळतात असा त्यांचा विश्वास होता.. पण गार्गी तयार होत होती त्याला मात्र कारण काही वेगळाच होतं..
आज गार्गी खूप छान तयार होत होती.. पुन्हा पुन्हा आरश्यात स्वतःलाच बघून कधी लाजत होती तर कधी तिच्या या वेडेपणावर हसतही होती.. नेहमी अगदी साधी राहणारी गार्गी आज मात्र पूर्ण मेकअप करत होती.. कारणही तसंच होतं.. तिच्या बालमैत्रिणीच आज ...Read Moreहोतं.. घरच्यांनाही तिला चांगली तयार हो म्हणूनच सांगितलं कारण आता गार्गीच ही लग्न करायचं होतं आणि अश्या लग्नातच लोक बघतात आणि मग संबंध जुळतात असा त्यांचा विश्वास होता.. पण गार्गी तयार होत होती त्याला मात्र कारण काही वेगळाच होतं... आज या लग्नात तिचे सगळे जुन्या कॉलोणीमधले मित्र मैत्रिणी परिवार सोबत तिथे येणार होते.. त्यात प्रतिकही असणार होता... प्रतीक तिचा बालपणीचा
शुभमंगल सावधान, सावधान, सावधान!! " करत लग्नाची मंगलाष्टके संपलीत.. आणि मंडपातील एकेक जण आता जेवणाकडे धावू लागलं, कुणाला लवकर जायची घाई होती तर कुणाला भूक अनावर झाली होती.. ही चांडाळ चौकडी मात्र तशीच मजा करत मंडपातच बसली होती.. आणि ...Read Moreआणि बाबाचा ग्रुप ही तसाच या मुलांसारखा एकत्र अगदी मजेत वेळ घालवत होते...मध्ये मध्ये प्रतीक उठून काहीतरी आणायला जात होता किंवा तस दाखवत होता, तर कधी विवेकला मदत करायच्या बहाण्याने जात होता.. आणि तिकडूनच खांबाच्या आडून चोरून लपून तो डोळेभरून गार्गीला बघून घेत होता.. कारण गार्गी त्याचही पहिलच एकमेव प्रेम होती... तो आजही तिच्यावर तेवढच प्रेम करत होता जेवढं आधी
थोडावेळणी प्रतिकही आला.. त्याला बघून गार्गीला तिच्याकडे लपून बघणारा प्रतीक आठवला आणि त्याची खेचायच्या उद्देशानी ती बोलली.. गार्गी - काय मग झालं का तुझं काम?? आणि चेहऱ्यावर का बारा वाजलेत?? गार्गीच लग्न करणार आहेत हे पचवणं प्रतिकला अवघड जात ...Read Moreआणि ते त्याच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होतं.. प्रतीक - हो झालं.. ते आईला काम होतं तर घरी गेलो होतो.. आणि मला काय झालं चेहऱ्यावर बारा वाजायला.. मी तर खुशच आहे.. ( जरासा हसतच तो म्हणाला) स्वतःला शक्य तितक नॉर्मल ठेवायचा तो प्रयत्न करत होता.. पण त्याचे डोळे इतके बोलके होते की गार्गी ते सहज वाचू शकत होती.. विवेक -
गीतच्या लग्नानंतर काही दिवसांनी रोहितच्या घरच्यांकडून गार्गी साठी विचारनी झाली होती पण तेव्हा गार्गी प्रतिकची वाट बघत होती.. त्याला मनवण्याचा असफल प्रयत्न करत होती.. त्यामुळे तिने रोहितला नकार दिला होता.. आणि कारण देताना तो खूप लांब राहतो मला इतकं ...Read Moreआईबाबांना सोडून जायचं नाही मला तिकडे राहवणार नाही असं सांगितलं होतं.. आई बाबांनी तिला खूप समजावलं पण तेव्हा ती तयार नव्हती... आणि तिच्या इच्छेविरुद्ध तीच लग्न ते लावून देणार नव्हतेच... तिला वाटायचं आज उद्या प्रतीकला माझं प्रेम नक्की कळेल आणि तो परत येईल माझ्याकडे.. एकदा तिने तपास केला असताना तिला कळलं होतं की त्याच्या आयुष्यात तिच्या नंतर कुठलीच मुलगी आली
साक्षगंध झालं आणि त्वरीतच लग्न मुहूर्त बघण्यात आला.. सगळ्यांच्या सोयीनुसार काढताना तो मुहूर्त चक्क 10 महिन्यानंतरचा निघाला.. गार्गी खुश होती उशीराच मुहूर्त निघाला म्हणून.. कारण आता तिला जून सगळं विसरून नव्याने गुंतायचे होते.. आणि यासाठी तिला वेळ हवाच ...Read Moreतसा तो मिळाला..गार्गी कुण्या दुसऱ्याची होणार आता कायमची हा विचार करून प्रतीक मात्र पूर्ण बिथरून गेला पण सगळ्यांसमोर तस काहीच न दाखवता स्वतःला कसंबसं सावरत तो त्याच्या खोलीत गेला, आतून कडी लावून घेतली आणि रात्रभर ढसाढसा रडला.. आज तिच्या सर्व आठवणी त्याला छळत होत्या.. पण हे त्यानीच घेतलेलं पाऊल होतं.. त्यानेच तिला स्वतःपासून लांब केलं होतं.. ती दुसऱ्या कुणाची होताना त्याला
मित्रमैत्रिणींच्या मस्तीमध्ये गार्गी सकाळची बाब विसरली होती... पण रात्री जेव्हा गौरवचा फोन आला तेव्हा मात्र ती पुन्हा विचारात पडली, कसाबसा तिने फोन घेतला.. गौरव - हॅलो, गार्गी गार्गी - हा, हॅलो बोल ना.. गौरव - झालं का जेवण? गार्गी ...Read Moreहो आताच झालं.. तुझं?? गौरव - हो माझ ही आताच झालं... गौरव अगदी मोकळेपणाने सगळ्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होता.. सकाळच्या वाक्याबद्दल त्याने विषयही काढला नाही की तीच उत्तरही विचारलं नाही, गार्गी मात्र अजूनही अवघडल्यासारखीच बोलत होती.. गौरव - गार्गी काय झालं?? तू इतकी शांत का आहेस?? काही बोलत का नाहीय?? गार्गी - बोलते तर आहे ना.. गौरव - नाही
दिवाळीचा सण एक महिन्यावर आला होता.. आणि गौरवची आई बोलली की या दिवाळीला आपल्या सुनेला घरी बोलवूयात.. गौरव तर खूपच खुश झाला गार्गीला घरी बोलवायचं म्हंटल्यावर.. त्यालाही तिला भेटावस वाटतच होतं .. त्याने लगेच फोन करून गार्गीला सांगितलं..गौरव - ...Read More, गार्गी.. guess what??गार्गी - अम्म्मम... तुला hike मिळाली?? किंवा प्रोमोशन मिळालं??गौरव - नाही माझ्या नोकरीशी रेलेटेड नाहीय.. आपल्या दोघांशी रिलेटेड आहे..गार्गी - मsssग... लग्नाची शॉपिंग करायचीय?? गौरव - गार्गी अग अजून किती वेळ आहे आपल्या लग्नाला, इतक्या लवकर शॉपिंग करत का कुणी... गार्गी - अरे मग मला नाही माहिती.. तुच सांग पटकन.. तुझा आनंद पाहून माझी excitment वाढत आहे.. गौरव - ok...
दिवाळीची पूजा आटोपली... दोघेही तिथेच राहत असलेला गौरवचा मित्र आशिष त्याला भेटले , त्याला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात.. आणि त्याच्याकडून दोघांचे छान फोटो काढून घेतलेत.. काही गौरव बरोबर तर काही गौरवच्या आईबाबांबरोबर, काही पूजा करताना , रांगोळी काढताना, दिवे लावताना ...Read Moreबरेच वेगवेगळ्या पोज मधले फोटो काढून झाल्यावर त्यांचं फोटो सेशन संपलं.. सगळ्यांनी जेवण केलेत आणि थोडावेळ गप्पा मारून सगळे झोपी गेले.. गौरवला मात्र झोप येत नव्हती.. फोटो काढताना गार्गीचा झालेला स्पर्श आठवून तो मनातल्या मनात आनंदी होत होता.. आणखी विशेष म्हणजे एरवी ती त्याच्यापासून लांब पळायची पण आज गार्गीने कुठलाच विरोध केला नाही.. त्याने पटकन मोबाइल हातात घेतला आणि आज
रात्री तिची जायची वेळ झाली पण गौरव मात्र अजूनही रुसलाच होता.. तिला त्याचा रुसवा कळत होता, पण मनवता आलं नाही.. सगळं आवरून दोघेही स्टेशन कडे निघाले.. तो तिला सोडायला जात होता.. जस जशी गाडीची वेळ जवळ येत होती गौरवची ...Read Moreआणखी वाढत होती.. शेवटी त्याने आपला रुसवा सोडला आणि गार्गी सोबत बोलायला लागला.. त्याला वाटलं 'जेवढा वेळ आहे तो तरी निदान आनंदाने सोबत घालवावा आणि मी तिला अस रुसून बाय केलं तर तिला पण वाईट वाटेल' म्हणून तो शांत झाला आणि तिच्याशी बोलू लागला.. गौरव - गार्गी, नीट सांभाळून जा.. मला फोन करत राहा.. आणि पोचली की पण लगेच सांग, मी
अमितला बघताच गार्गी त्याच्या जवळ गेली.. गार्गी - अमित तू इथे काय करतोय?? अमित - हुश्श , आली तुझी गाडी .. किती फोन केलेत तुला तुझा फोनच लागत नाहीय.. अग अर्धा तास झाला मी वाट पाहतोय तुझ्या गाडीची.. गार्गी ...Read Moreअरे हो पण का?? अमित - अग तुला घरी सोडायचं ना.. गार्गीला काही कळत नव्हतं.. तिच्या बाबांनी तिला फोन करायचा प्रयत्न केला तेव्हा तिचा फोन कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर होता त्यामुळे अमित घ्यायला येतोय हे त्यांना गार्गीला कळवताच आलं नाही..गार्गी - अरे बाबा येणार होते मला घ्यायला , तू कसा आला?? ते ही इतका उलटा फिरून..अमित - तुला काकांनी सांगितलं नाही का?? अग मी प्रतिकला सोडायला
आज लग्नाचा दिवस आला.. गार्गी लग्नाच्या त्या मरून शालू , हिरवे काठ आणि सोनेरी ओढणी मध्ये खूपच सुंदर दिसत होती.. गौरव तीचं पहिलं प्रेम नसला तरी तो तिच्यावर किती प्रेम करतो तिला माहिती होतं आणि एवढं प्रेम करणारा, ...Read Moreघेणारा, विश्वासु त्याच्यासारख्या मुलगा तिचा नवरा असणं तीच सौभाग्यच आहे असं ती समजत होती.. आणि म्हणूनच गौरवसोबत लग्न करण्याची खुशी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.. ..तसाच गौरवही सोनेरी रंगाच्या शेरवणीत खुलून दिसत होता.. आणि आजच्या दिवसाची तर त्याने कधीपासून आतुरतेने वाट पाहिली होती.. आज गार्गी त्याची होणार म्हणून त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होत..रंग, उंची , बांधा आणि एकमेकांना समजून घेण्याची क्षमता
आज गौरवचा वाढदिवस होता.... आज गार्गी सकाळपासूनच सगळं भराभर आवरत होती.. सुटीचा दिवस नसल्यामुळे नाईलाजाने गौरवला ऑफिसला जावंच लागणार होतं आणि तीच गार्गीला संधी मिळाली.. तिने वाढदिवसाच्या सजावटीच सगळं सामान आदल्यादिवशीच जाऊन आणलं होतं पण गौरवला काही कळू नये ...Read Moreमेघाकडे( तिची शेजारी मैत्रीण) कडे ठेवलं होतं.. तो ऑफिसला निघाला, जाताना त्याला फक्त कोरडं वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन तिने रवाना केलं, लग्नानंतरचा माझा पहिला वाढदिवस असूनही गार्गीने मला साधं औक्षवन सुद्धा केलं नाही.. म्हणून त्याला थोडं वाईट वाटलं पण लगेच " ठीक आहे .. सगळ्यांना अस सगळं नाही सुचत निदान wish तर केलं ना विसरली तर नाही एवढंच पुरेसे आहे, संध्याकाळी
अगदी आनंदात मज्जा घेत घेत पाहिलं वर्ष कसं संपलं दोघांना कळलंही नाही.. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला गौरव आणि गार्गी barbeque मध्ये गेलेत.. गार्गीने त्यादिवशी मुद्दाम लॉंग, स्लीवलेस, स्किन टाईट onepiece घातला होता.. त्यावर हलकासा ड्रेसला साजेशा मेकअप.. ती खूपच वेगळी ...Read Morestunning दिसत होती.. तिला बघून गौरव तर पुरता वेडा झाला होता.. barbeque मध्ये जायची गार्गीची कधीची इच्छा होती, पण कुठल्या तरी पर्वावर जाऊ यात अस तीच सुरू होत.. म्हणून मग लग्नाच्या वाढदिवशी गौरव तिला तिकडे घेऊन गेला.. तिथे त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे कळल्यावर तिथल्या वेटर नि केक आणला.. आणि सगळा त्यांचा स्टाफ गौरव आणि गार्गी भोवती जमा झालेत.. गार्गीला आधी कळलंच नाही
गार्गी - माझा साखरपुडा झाला ते तुला सहन झालं नव्हतं ना??यावर प्रतीकच उत्तर..प्रतीक - हो हेच कारण आहे गार्गी... मी तुला स्वतःहून माझ्यापासून लांब जायला भाग पाडलं त्याला ही कारण होतं.. तू किती मला पुन्हा आपल्या प्रेमाची जाणीव ...Read Moreद्यायचा प्रयत्न करत होती ते मला कळत होतं ग पण मी मुद्दामच तुझ्याशी अस वागत राहिलो.. कारण तूला वाटावं की आता माझं तुझं प्रेमाच नात संपलं.. आणि मग तू मला सोडून तुझ्या लायकीच्या मुलाशी लग्न करायला तयार होशील.. तुझ्या साखरपुड्याच्या दिवशी तू गौरवला अंगठी घातली नंतर तुम्ही एकांतात बोलत होतात नंतर तुझ्या लग्नाचा मुहूर्त निघाला या सगळ्या गोष्टी माझ्या मनाला कुठेतरी खूप
"गार्गी.. ऐ गार्गी.. " गौरव तिला उठवत होता.. तिला हात लावताच त्याला तीच अंग अगदी लोखंडाच्या तव्यासारखं गरम जाणवलं... लावला तसाच हात त्याने मागे ओढला.."हिला तर ताप भरलाय.. काल रात्री झोपायला आली तेव्हा तर ठीक होती.. आणि आता इतकं ...Read Moreअंग.. अचानक.. " तो विचर करत होता त्याला काही कळतच नव्हतं अस एकदम कसा ताप भरला ते.. " आता हिला उठवायलाच हवं " तापामुळे गाढ झोपली होती ती.. त्याने 2 - 3 दा तिच्या चेहऱ्यावर थंडं पाणी शिंपडले.. आणि तिला जाग आली.. ती उठली हे बघून त्याच जीव भांड्यात पडला.. ती उठताच घाईघाईने तो बोलू लागला.." गार्गी , अग काल तुला
नेहमीप्रमाणे आजही उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या होत्या आणि या सुट्यांमध्ये सगळे नेहमी एकत्र येऊन काहीतरी खेळ खेळायचे, काही जुने काही नवे.. दिवसभर घरगुती खेळ आणि संध्याकाळ झाली की मैदानी खेळ.. असच दुपारच्या वेळी गार्गी संदेश कडे गेली आणि सगळ्यांना खेळायला ...Read Moreपल्लवी, अमित ,विवेक ,सोनू, प्रिया, गीत, प्राची पण प्रतीक आला नव्हता.. गार्गीने अमितला विचारलं गार्गी - प्रतीक कुठंय??अमित - तू जाते का त्याला बोलवायला, मी आवाज दिला पण तो नाही म्हंटला.. काय झालं काय माहिती..गार्गी - नको मी नाही जात, जाऊ दे... त्याला वाटलं तर येईल नंतर.. अमित - हम्म, जाऊ दे .. चला आपण खेळ सुरू करू.. गार्गीला प्रतिकशिवाय करमतच नव्हतं, त्याच हसणं,
त्याला आज गार्गीच मन तिच्या डोळ्यांतून कळलं होतं.. आणि याचा त्याला आनंदही झाला होता.. पण "मी असा कसा वागलो ती काय विचार करत असेल" म्हणून त्याला थोडं टेन्शन सुद्धा आलंं.. त्याने मनातच विचार केला "घाई नको करायला म्हणून आता ...Read Moreनंतर बोलूयात" म्हणून त्याने गार्गीला पाणी दिलं आणि तो विषय मोडत, प्रतिक - कमाल आहे हा गार्गी.. तू कधीच हरत नाही हा खेळ.. पण एक दिवस मी तुला नक्की हरवेल बघ तू.. पाणी पिऊन झाल्यानंतर ती ही नॉर्मल झाली... आणि तेवढ्याच ठसक्यात त्याला बोलली..गार्गी - अरे चल, तू नाही हरवू शकत मला, मी पण वाट बघेल तो दिवस कधी येतो त्याची...प्रतीक -
भाग 16दोन आठवडे असेच निघून गेलेत पण गार्गीने अजूनही तिच्या मनातल्या भावना सांगितल्या नव्हत्या... त्याला कितीदा वाटलं जे नेहमी तिच्या नजरेतून त्याला दिसतं ते तिने लवकरात लवकर तिच्या ओठांवर आणावं.. पण गार्गी मात्र अजूनही काही बोलत नव्हती.. अशातच तिचा ...Read Moreआला.. आणि प्रतिकनेच तिच्याशी बोलायचं ठरवलं.. त्या रात्री बराच वेळ दोघे मॅसेज वर बोलत होते.. बोलता बोलता रात्रीचे 11:30 वाजले असतील की प्रतीकचा मॅसेज आला.. प्रतीक - "गार्गी दार उघड, मी तुझ्या घराबाहेर उभा आहे.."गार्गीला वाटलं हा मस्करी करतोय, तिने पुन्हा त्याला मॅसेज केला..गार्गी - " काहीही काय मस्करी करतो?? एवढ्या रात्री माझ्या घराबाहेर काय करतोय तू??"प्रतीक - " गार्गी अग
असेच किती तरी क्षण दोघेही मस्ती करत तर कधी प्रेमाच्या भावना व्यक्त करत जगत होते.. मित्रांच्या ग्रुप मध्ये ते नेहमीसारखेच असायचे पण एकांतात कधी भेटून त्यांच्या प्रेमला बहर द्यायचे.. नवेनवे बहाणे देऊन दोघेही कधी बगिच्यात मध्ये तर कधी सिनेमा ...Read Moreजायचे.. तर कधी असच रात्रीच्या वेळेला गच्चीत भेटायचे.. चंद्राकडे बघत किती किती वेळ त्याच्या साक्षीने त्यांच्या प्रेमला आकार द्यायचे.. असच एकदा दोघे एकांतात बसले असताना गार्गीच्या मनातली शंका गार्गी बोलू लागली.. गार्गी - प्रतीक, आपलं हे नक्की प्रेमच आहे ना रे?? तू मला कधी सोडून तर जाणार नाहीस ना?? प्रतीक - काय झालं गार्गी?? तू आज अचानक असं का विचारतेय??
एकदा निशा ताईची मैत्रीण रेणुका ताई बद्दल प्रतिकला कळलं.. रेणुका ताईने तिच्या प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न केलं.. रेणुका ताईला प्रतीक आणि गार्गी सुद्धा ओळखत होते.. हे ऐकून तर सगळ्यांना धक्काच बसला.. पण घरच्यांनी नकार दिल्यामुळे तिने अस केलं होतं.. ...Read Moreमुलाची आर्थिक, सामाजिक परिस्थिती , जात हे सगळं रेणुका ताईच्या घराशी जुळणारं नव्हतं... म्हणून घरच्यांचा नकार होता.. पण रेणुका ताईच्या अशा वागण्यामुळे प्रतिकला त्याच्या घरच्यांची मतं समजली.. ते ही किती कट्टर जातीवादी आहेत हे तेव्हा त्याला त्यांच्या रेणुका ताईबद्दलच्या बोलण्यातून जाणवलं .. त्याच्या डोक्यात नकळत त्याचा आणि गार्गीच विचार आला..आणि त्याच्या मनात एकदम भीती दाटून आली.. 'अजून बराच वेळ आहे
आता प्रतिकच्या अश्या तुटक वागण्यामागचं कारण गार्गीला कळलं होतं.. आणि त्याची मनःस्थिती तिनेही समजून घेतली.. कदाचित या सगळ्याचा काही सकारात्मक परिणामही होऊ शकतो अस तिला वाटलं पण प्रतिक शिवाय तिला खूप अवघड जात होतं.. दोन दिवसांनी तिने पुन्हा प्रतिकला ...Read Moreकेला आणि प्रतिकने तो उचलला .. तिने मनातच.. " हुश्श, थँक्स देवा.." प्रतीक - हॅलो.. तिकडून काहीच आवाज आला नाही.. म्हणून त्याने पून्हा.. हॅलो.. हॅलो.. गार्गी.. गार्गी - हा.. हॅलो.. प्रतीक - अग काय झालं? फोन करते आणि बोलत नाही.. गार्गी - अरे नाही तस नाही.. तू फोन उचलला म्हणून देवाला धन्यवाद करत होते.. प्रतीक - फोन मी उचलला ना
खिचडी झाली होती.. गौरवाने ताटात वाढून आणली आणि तिला "जेवून घे आणि आराम कर" एवढं बोलून निघून गेला.. त्याच काहीच न बोलणं तिच्या मनाला रुतत होतं.. पण तोही किती दुखावला आहे हे ही तिला कळत होतं.. त्याने काहीतरी बोलावं ...Read Moreमनात काय आहे ते एकदा तरी सांगावं अस तिला मनोमन वाटत होतं.. पण गौरव खूप शांत झाला होता.. त्यानेही तिकडे ताट वाढून घेतलं आणि tv बघत जेवण केलं.. tv सुरू होता पण त्याच त्यात काय सुरू आहे याकडे लक्षच नव्हतं, तो त्याच्याच विचारात जेवत होता.. गार्गीच जेवण आटपून गार्गी ताट घेऊन बाहेर आली.. तेव्हा tv वर मल्याळम चॅनेल सुरू होतं
गौरव - गार्गी, तू त्यादिवशी तुझ्या आणि प्रतिकबद्दल मला सगळं सांगितलं.. मीही ऐकलं.. आणि आजकाल सगळ्यांनाच भूतकाळ असतो.. त्यात काहीच नवल नाही.. पण एक प्रश्न मला पडला की हे सगळं तू मला आधी का नाही सांगीतलं?? आणि त्यादिवशी अचानक ...Read Moreत्याची आठवण आली आणि ती इतकी तीव्र की तू चक्क तापाने फणफणली.. म्हणजे आजही तू प्रतीक आणि त्याच्या प्रेमासाठी किती भावूक आहेस.. गार्गी तुझ्या त्यादिवशीच्या त्या भावुक होण्याने माझ्या मनात खूप खूप सारे प्रश्न निर्माण केलेत ग.. आणि त्याची उत्तर मी स्वतःच स्वतःला द्यायचा प्रयत्न करतोय.. गार्गी - हो गौरव काही वेळासाठी मी भावुक झाले होते कारण खरच प्रेम होतं रे
गार्गीने जेवण केलेलं नव्हतं म्हणून गौरवाने स्वतःच तिला भरवलं.. थोडावेळ tv बघून दोघेही झोपी गेले आज गार्गीला खूप मोकळं वाटत होतं त्यामुळे गौरवच्या कुशीत तीला लगेच शांत झोप लागली पण आज गौरव मात्र जागी होता..त्याला प्रतीकच बोलणं आठवत होतं.. ...Read Moreतो गार्गीला न सांगता ऑफीसमधून लवकर निघून परस्पर प्रतिकला भेटायला गेला होता.. त्याच्या मनातल्या शंकांचे निरसन करण्यासाठी आणि आणखी काही प्रश्न त्याला प्रत्यक्षात विचारण्यासाठी..लग्नात ओळख झालीच होती प्रतिकची आणि गौरवची तशी.. ते दोघेही एका हॉटेलमध्ये कॉफी प्यायला भेटले.. गौरवने गार्गीबद्दल महत्वाचं बोलायचं आहे असं म्हंटल्यामुळे प्रतीक सगळं सोडून आधीच दिलेल्या पत्त्यावर येऊन गौरवची वाट बघत होता.. 5 मिनिटं झाले असतील तेवढ्यात
गार्गीच्या मित्रांच्या ग्रुप मधल्या 2-3 मुलामुलींचे पण लग्न झालेत.. पण गार्गीने मात्र त्यांच्या लग्नाला जायचं टाळलं होतं.. कदाचित तिला भीती होती की लग्नात प्रतिकचा सामना झाला आणि मी पुन्हा विचलित झाली तर गौरव पुन्हा गैरसमज करून घेईल.. किंवा उगाच ...Read Moreघेईल म्हणून ... आता पुढचं लग्न अमितच होतं..आज सकाळी सकाळीच अमितचा गार्गीला फोन आला..गार्गी - हॅलो, गुड मॉर्निंग अम्या.. आज सकाळी सकाळी फोन??अमित - हो मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आणि तुझ्याकडून एक प्रॉमिस हवं आहे, बोल देशील??तो उगाच सिरीयस होऊन तिला घाबरवण्याचा प्रयत्न करत होता .गार्गी - काय झालं अमित?? सगळं ठीक आहे ना?? तुला माझ्याकडून कसलं प्रॉमिस पाहिजे
पुढे गौरव आणि गार्गी आनंदाने सोबत राहू लागले.. सोबतच आता गौरवचे आई वडीलही इकडेच कायमचे राहायला आले होते.. त्यामुळे घरात दोघांच्या अगदी बिनधास्त आणि बेधडक वावरण्यावर थोडासा प्रतिबंध लागला.. पण गार्गीचा दिवसभरचा घरात जाणवणारा एकटेपणा दूर झाला.. गार्गी त्यांच्या ...Read Moreआदराने वागायची.. मुळातच बोलका स्वभाव असल्यामुळे गार्गी त्यांच्याशी बऱ्याच गप्पा गोष्टी करायची.. त्यामुळे त्यांनाही बोर होत नसे आणि गार्गीलाही करमायचं..तसही आता गार्गीने आपल्या भावनांना कसं लपवायचं शिकून घेतलं होतं, त्यामुळे तीच्या मनाची अवस्था आता गौरवला कधीच कळत नव्हती.. तिला प्रतिकची अनेकदा आठवण यायची पण तस कधीच तिने गौरवला जाणवू दिलं नाही.. ती खुश आहे आणि कदाचित प्रतिकला विसरत आहे असाच
दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच गार्गीची तपासनी आणि iv वगैरे लावणे सुरू झालं.. थोडावेळासाठी फ्रेश व्हायला म्हणून गौरव आणि आई घरी गेलेत आणि गार्गीचे वडील तीच्याजवळ थांबले होते.. ओपरेशनच्या वेळेपर्यंत येऊ म्हणून ते गेलवत पण 9:30 चा वेळ दिला असताना 9 ...Read Moreगार्गीला ओपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेले.. तिच्या वडिलांना काही सुचत नव्हतं पण त्यांनी लगेच फोन करून गौरव आणि आईला बोलावून घेतलं आणि गार्गीलाही गौरवनी यावं आणि तिला भेटावं अस वाटत होतं.. पण त्याला थोडा उशीरच झाला आणि ओपरेशनच्या आधी त्याला तिला भेटता आलंच नाही.. 10 : 30 पर्यंत गार्गीच ओपरेशन झालं होतं.. सर्वात आधी डॉक्टरांनी गार्गीच्याच मुलीला दाखवलं.. पण शुद्धीत
गार्गीच्या बोलण्यावर गौरवने रात्री झोपताना विचार केला.. त्याने गेल्या काही दिवसांत सोबत घालवलेले क्षण आठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला काही आठवतच नव्हतं.. "खरच आपल्या लक्षातच आलं नाही की आपण गार्गीपासून लांब होत चाललोय?? पण अस का होतंय?? मी तर ...Read Moreफक्त तिच्यावरच प्रेम करतो.. पण माझी परी आली आणि तो वेळ आता माझ्या परीला देतादेता परी च्या आईलाही माझी गरज असेल अस कधी जाणावलंच नाही.. आधी तर तिच्याशिवाय ना सकाळ व्हायची ना रात्र.. कधी तिला सांगितल्याशिवाय ऑफिसला पण जायचो नाही आणि आता ती सात महिने माझ्यापासून लांब राहिली तर माझी सवयच मोडली.. आज ती बोलली म्हणजे नक्कीच तिला कुठेतरी एकटेपणा
प्रतीक बसमध्ये बसला आणि त्याच विचारचक्र गाडीच्या चाकांसोबतच फिरू लागलं.." काय करत होतो मी आज.. काय विचार करून गार्गीला भेटायला निघालो होतो.. कशीतरी सावरली असेल ती.. गौरवसोबत रमली असेल नि मी तिच्यापुढे येऊन आज पुन्हा तिला विचलित करणार होतो.. ...Read Moreझालं आधीच लक्षात आलं आणि लगेच परतलो.. स्वतःहून तिच्याशी दुरावा निर्माण केला, कधीच तिच्याशी नीट बोललो नाही, मनावर दगड ठेऊन तिला दुखावत राहिलो , कशासाठी?? तिने मला विसरून तिच्या संसारात मन रमवावं यासाठीच ना, आणि आज हे काय करणार होतो मी.. पण आता माझा साखरपुडा होणार आहे , गार्गीबद्दल मनात इतकं प्रेम आहे की ते विसरणं तर शक्य नाही पण पुढच्या
सकाळी गार्गी उठून एकदम आनंदाने घरात वावरत होती.. तिला वाटलं आज तिला गौरव गिफ्ट देणार आहे आणि तो कुठल्या अंदाजाने देतोय हे तिला बघायचं होतं.. पण त्याच्याकडे बघितलं असता त्याच तस काहीच त्याच्या वागणुकीवरून वाटत नव्हतं.. अगदी रोजच्या सारख ...Read Moreरुटीन सुरू होतं.. गार्गीने काल बॅग उघडून बघितलेच त्याला माहितीच नव्हतं.. तो योग्य वेळेची वाट बघत होता खरंतर सगळ्यांसमोर ते गिफ्ट त्याला गार्गीला द्यायचं नव्हतं, त्याने आज थोडा वेगळा विचार केला होता.. गार्गीने दिवसभर वाट बघितली रात्रीही झोपायला जाईपर्यंत ती वाट बघत होती.. पण गौरव मात्र अजूनही तसाच त्याने गिफ्ट दिलं पण नाही आणि काही बोलला पण नाही.. म्हणून नाराज
काही दिवसांनी प्रतिकचा साखरपुडा होता.. पण त्यासाठी जाणं गार्गीला जमलं नाही आणि कदाचित तीला वाटलं उगाच आपल्याला बघून प्रतीक विचलित होईल.. त्याने कठोर होऊन त्याच्या आयुष्याची वाटचाल सुरू केलीय तर त्यात आपण उगाच त्याला कमजोर करण्यापेक्षा आनंदाने त्याच्या या ...Read Moreत्याला साथ द्यावी.. पण ज्यादिवशी साखरपुडा होता त्यादिवशी मात्र गार्गीच्या मनाची अवस्था खूपच चलबीचल झाली होती.. पण आज गौरव तिच्याजवळ होता.. त्याने तिला खूप प्रेमाने आणि धीराने सावरलं.. त्यामुळे गार्गीसुद्धा लगेच सावरली.. आणि गौरव सारखा समजून घेणारा नवरा मिळाला म्हणून त्याला आणि देवाला धन्यवाद देत होती.. तब्बल जवळपास एक महिन्यानंतर गौरवला ऑफिस मधून एक ऑर्डर आली त्यामध्ये असं लिहिलं होतं
ती विचार करत तिथेच हॉस्पिटलमधल्या एक बाकड्यावर बसली.." आता काय करू?? घरी तर सगळं आई सांभाळून घेतील पण मी ऍडमिट असताना इथे कोणाला थांबावं लागेल कुणाला सांगू?? गौरवला सांगितलं तर तो तिकडे एकटा आहे. आणि त्याच मन फार हळवं ...Read Moreकमजोर आहे.. अस काही मी जर फोन वर सांगितलं आणि त्याने तिकडे टेन्शन घेऊन आजारपण ओढवून घेतलं तर.. नको नको, मी त्याला फोनवर नाही सांगणार काहीच.. फक्त लवकर ये म्हणून सांगते, पण काय झालं असं अचानक विनाकारण मी का बोलवतेय?? अस साहजिक प्रश्न विचारेल तो..तेव्हा मी काय सांगणार?? आणि साधं खूप आठवण येत आहे म्हणून तू सगळं सोडून ये सांगितलं
आज सकाळी सकाळीच गार्गीला प्रतिकचा फोन आला.. प्रतीक - हॅलो, गार्गी.. गार्गी - हॅलो, बोल प्रतीक.. आज अचानक कसं काय कॉल केला??प्रतीक - तू घरीच आहे ना आज? मी येत होतो पत्रिका घेऊन तुझ्या घरी..गार्गी - नाही प्रतीक तू ...Read Moreकर ना मला पत्रिका व्हाट्सअप्प करून दे, मी बघते ते ... मी जरा गावी आलीय.. थोडं काम होत तर.. आणि इकडेच थांबणार आहे काही दिवस.. तर तू नको येऊ.. प्रतीक - ओहह, ठीक आहे मी पाठवतो तुला व्हाट्सअप्प वर पत्रिका.. खरंतर मला तुला एकदा भेटायचं होतं.. पत्रिका तर फक्त बहाणा होता.. आणि तू साखरपुड्याला पण नाही आली..गार्गी - ठीक आहे नंतर भेटू,
मागच्या आणि आतापर्यंत सर्वच भागांवर आपण नेहमीच अभिप्राय देऊन माझं मनोबल वाढवत राहिलात.. त्यासाठी खरच आपले मनापासून खूप खूप आभार!!! तुमच्या प्रतिक्रिया वाचणे माझ्यासाठी खूप आनंददायी पर्वणीच असते.. भाग यायला उशीर होतो पण त्याला काही कारणं आहेत ...Read Moreथोडं समजून घ्या मी समजू शकते की लिंक तुटते..मीही प्रयत्न करतच असते पण कधी कधी नाहीच जमत वेळ काढायला, गेले काही दिवस घरात बरीच पाहुणे मंडळी आली आहेत त्यामुळे यावेळी वेळ मिळाला नाही.. तुम्हाला वाट बघावी लागली त्यासाठी माफ करा.. जमल्यास पुढचा भाग लवकर टाकायचा प्रयत्न करते..--------------------------------------------------------------आज गार्गीच ओपरेशन होतं.. सकाळपासून गौरांगी सोबत गार्गी वेळ घालवत होती.. तिला सोडून जाताना का
गार्गीला दुसऱ्या खोलीत आणलं , खोली खूप छान हवेशीर आणि भरपूर नैसर्गिक उजेड येईल अशी होती.. त्याला दोन खिडक्या आणि ऐसपैस खोली होती.. तिला खोलीत पोचवल्यावर नर्स ने तिला विचारलं की "खोली आवडली का ताई आता?" पण ...Read Moreकुठे लक्ष होतं ती केव्हाच त्या स्पर्शाच्या विचारांत गुंतली होती.. "कोण असेल ती व्यक्ती तो स्पर्श मला एवढ्या जवळचा का वाटत होता?? अस वाटत होतं की मी त्या स्पर्शाला खूप चांगलं ओळखते.. तो गौरव तर नव्हता ना?? नाही नाही काहीही काय विचार करते गार्गी, जर चांगला विचार कर... अस नसेल , उगाच तू तुझ्या संभ्रमात आहे किंवा गौरव आला नाही म्हणून
गार्गीच्या वडिलांनी प्रतिकला गार्गीच्या घरून सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन येण्यास सांगितलं.. आणि तसच घरी सुद्धा फोन करून कळवलं.. त्यानेही लगेच सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं.. गार्गीच्या वडिलांनी मोठ्या कष्टाने सगळ्यांना गौरवच्या अकॅसिडेंट बद्दल सांगितलं.. ते ऐकून सगळ्यांच्या शरीरातील त्राण च निघून गेला.. ...Read Moreक्षण कुणीच काही बोललं नाही पण गार्गीच्या सासूला अनावर झालं.. आणि "हे खरं नाही, अस नाही होऊ शकत माझा मुलगा आणि सून दोघांनाही देव अस मरणाच्या दारात उभं नाही करू शकत, काय दोष आहे या निष्पाप जीवाचा की तिच्या आई आणि वडील दोघांचीही अशी स्थिती आहे.. आईसाठी केवढी तळमळते आहे पोर.. बाबा येणार आहे म्हणून केवढी खुश होती ती.. नाही
मनातल्या मनातच विचार करता करता प्रत्येक विचारागणिक गार्गीचा श्वास वाढत होता, तिच्या बंद डोळ्यांतून अश्रू बाहेर पडत होते... नर्स नि ते बघितलं आणि लगेच तिच्या आईला हाक मारली.. तसच आईनेही स्वतःला सावरत आणि चेहऱ्यावर खोटं हसू ठेवत तिच्याजवळ ...Read Moreती झोपलेली दिसत होती व डोळ्यात पाणी सुद्धा होतं.. म्हणून आईने तिच्या डोक्यावरून हलकाच हात फिरवून तिला उठवलं..तिनेही लगेच डोळे किल किल करत उघडले.. आणि आईला पुढे बघून तिला हायसं वाटलं.. तिने लगेच आईचा हात हातात घेत आईला म्हंटल गार्गी - आई मला एक वचन देशील.. आई - कोणतं वचन?? गार्गी - मला आणि गौरवला जर काही झालं तर माझ्या मुलीला