शेवटचा क्षण - भाग 16

  • 7.3k
  • 1
  • 3.9k

नेहमीप्रमाणे आजही उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या होत्या आणि या सुट्यांमध्ये सगळे नेहमी एकत्र येऊन काहीतरी खेळ खेळायचे, काही जुने काही नवे.. दिवसभर घरगुती खेळ आणि संध्याकाळ झाली की मैदानी खेळ.. असच दुपारच्या वेळी गार्गी संदेश कडे गेली आणि सगळ्यांना खेळायला बोलावलं.. पल्लवी, अमित ,विवेक ,सोनू, प्रिया, गीत, प्राची पण प्रतीक आला नव्हता.. गार्गीने अमितला विचारलं गार्गी - प्रतीक कुठंय??अमित - तू जाते का त्याला बोलवायला, मी आवाज दिला पण तो नाही म्हंटला.. काय झालं काय माहिती..गार्गी - नको मी नाही जात, जाऊ दे... त्याला वाटलं तर येईल नंतर.. अमित - हम्म, जाऊ दे .. चला आपण खेळ सुरू करू.. गार्गीला प्रतिकशिवाय करमतच नव्हतं, त्याच हसणं,