तू_ही_रे_माझा_मितवा... - 9

(13)
  • 11.6k
  • 2
  • 5.7k

#तू_ही_रे_माझा_मितवा...????#भाग_९“हेलो,तनु sorry त्रास देतोय थोडा, ऋतू उठलीय का? फोन घेत नाहीये आणि मेसेजला रिप्लाय पण नाहीये..” खरंतर वेद कालच्या घाईगडबडीच्या प्रवासाने आणि जागरणाने पार थकून गेला होता पण विकेंडमुळे सगळं निवांत होतं,तो जरा उशिराच उठला होता,त्यात ऋतू फोन उचलत नाहीये म्हणून त्याने तनुला फोन केला.“अरे,हो ते काय झालं सकाळीच तिच्या घरून फोन आलेला,लागलीच निघून ये म्हणून,मग ती गेली इंदापूरला,एव्हाना पोहोचली असेल.काहीतरी प्रॉब्लेम आहे एवढच म्हणाली.”“प्रॉब्लेम? काय..? तुला तर माहिती असेलच ना?” मनात काहीबाही शंका यायला लागल्याने तो जरा गोंधळला.“अरे म्हणजे खात्रीने नाही सांगू शकत काय ते,खरतरं ती घरच्यांबद्दल जास्त बोलत नाही. घरचे प्रॉब्लेम शेयर करायला नाही आवडत तिला.ती आल्यावर तिलाच विचार.