अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 16

(12)
  • 7.6k
  • 4.6k

सुरुवातीचे दोन महिने सगळ्यांचाच अतरंगीपणा करण्यात गेला असल्या कारणाने कोणाचाही अभ्यास असा झाला नव्हता. कॉलेजचे लेक्चर सोडले तर त्या व्यतिरिक्त कोणीही स्वतःहुन पुस्तक उघडुन अभ्यास केला नव्हता त्यामुळे परीक्षेच्या भीतीने दुसऱ्यादिवशी सगळेच आपापल्या रूममध्ये बसुन अभ्यास करत होते शिवाय शौर्य.. त्याच मात्र त्याचा लॅपटॉप आणि तो.. वृषभ आणि रोहनची दुसऱ्या दिवशी डिस्ट्रिक्ट लेव्हलची मॅच असल्यामुळे पूर्ण दिवस दोघेही त्यात गुंतून गेलेले असतात. प्रॅक्टिस संपताच रोहन आणि वृषभ ग्राउंड मधुन बाहेर पडतात. "वृषभ मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय..", रोहन थोडा गंभीर चेहरा करतच बोलतो. वृषभ : "बोल की मग एवढं काय विचार करतोयस??" रोहन : "ते.. कस बोलु कळतच नाही रे.."