अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 18

(15)
  • 8.9k
  • 4.2k

शौर्यने दिलेला डब्बा उघडताना समीराच्या हृदयाची धडधड वाढत होती. अलगदपणेच तिने डब्याच झाकण उघडलं.. त्यावर एक कार्टुन काढलेले असत.. त्या कार्टुनच्या टिशर्टवर S हे अक्षर लिहिलेलं असत. त्या कार्टुन ने हातात एक बोर्ड पकडला असतो.. त्यावर " I Aम इN... "एवढंच लिहिलं असत.. समीरा तो कागद हातात घेऊन शौर्यने काढलेल्या त्या चित्राचा अर्थ लावत बसते.. आय एम इन.. पण पुढे काय?? अस अर्धवट कस काय पाठवल.?? पंधरा एक मिनिटं तिची अशीच विचार करण्यात निघुन जातात. ती तो कागद असाच डब्ब्यात ठेवणार तोच तीच लक्ष डब्यात असणाऱ्या खुप सुंदर आणि आकर्षीत अश्या चॉकलेटांकडे गेले.. गोल्डन रेपर्सवर मध्ये गुंडाळून ठेवलेली हार्ट शेप