मिले सूर मेरा तुम्हारा - 2

  • 7.4k
  • 3.1k

थोड्याच दिवसात एका चांगल्या शुभ मुहूर्तावर मोजक्या पाहुण्यांच्या साक्षीने निनाद आणि वृंदाचा शुभविवाह पार पडला. वृंदा नवरी म्हणून सजलेली खुपंच छान दिसत होती. कोपरा पर्यंत भरलेले मेहेंदीचे हात, हातातला हिरवा चुडा, त्यात मोत्यांच्या कडा, कपाळावर अर्ध चंद्राची टिकली, डोळ्यात काजळ, नाकात मोत्याची ओठांपर्यंत येणारी नथ, कानातले झुमके आणि केसांच्या आंबाडयातले सोनेरी फुल, गळ्यात सुंदर मोत्याची ठुशी आणि एक लक्ष्मीहार, त्यात हळदी च्या वेळेस घातलेला पिवळा धागा, हातातले हळकुंड, पायातले पैंजण, या सगळ्यात ऊठून दिसणारी निळ्या काठांची गुलाबी नऊवारी साडी आणि भर म्हणून नुकतंच निनाद ने तिच्या भांगेत भरलेले कुंकू, गळ्यातले दोन वाट्यांचे मंगळसूत्र, पायातले जोड्वे आणि मुंडावळ्या.. तिचं सौंदर्य अजून