शेवटचा क्षण - भाग 31

  • 7.4k
  • 3.3k

काही दिवसांनी प्रतिकचा साखरपुडा होता.. पण त्यासाठी जाणं गार्गीला जमलं नाही आणि कदाचित तीला वाटलं उगाच आपल्याला बघून प्रतीक विचलित होईल.. त्याने कठोर होऊन त्याच्या आयुष्याची वाटचाल सुरू केलीय तर त्यात आपण उगाच त्याला कमजोर करण्यापेक्षा आनंदाने त्याच्या या निर्णयात त्याला साथ द्यावी.. पण ज्यादिवशी साखरपुडा होता त्यादिवशी मात्र गार्गीच्या मनाची अवस्था खूपच चलबीचल झाली होती.. पण आज गौरव तिच्याजवळ होता.. त्याने तिला खूप प्रेमाने आणि धीराने सावरलं.. त्यामुळे गार्गीसुद्धा लगेच सावरली.. आणि गौरव सारखा समजून घेणारा नवरा मिळाला म्हणून त्याला आणि देवाला धन्यवाद देत होती.. तब्बल जवळपास एक महिन्यानंतर गौरवला ऑफिस मधून एक ऑर्डर आली त्यामध्ये असं लिहिलं होतं