बयो ... माझ्या आठवणीतली..

  • 8.5k
  • 1
  • 2.4k

गर्दी आणि भयानक गर्दी... मी आणि कौस्तुभ.. सलग नऊ तास प्रवास.. मध्यरात्रीनंतरचा.. आता सकाळचे अकरा वाजत आलेले.. मी भिंतीच्या अलीकडे उभी आहे.. ओस पडलेला लांबलचक रस्ता निवांत धुळीत पहुडला आहे.. काही शुष्क वाळलेली पाने.. जागच्या जागी वाऱ्यावर हलत आहेत.. थंडगार वाऱ्याची एखादी झुळूक येते आहे क्षणात जाते आहे.. परत परत का येते मी इथे... यावेळीही माझ्या मनात हाच विचार आहे... किती दिवस झाले.. महिने...की वर्षच्या वर्षे निघून गेली.. या वास्तू कडे जाणारा रस्ता लपूनछपून आपलाच पाठलाग करत राहतो की काय असं वाटत राहतं मला कधीकधी... इथे मी तासभर तरी आता उभी असेन... ही एक कंटाळवाणी उबदार दुपार आहे.. तीन मांजरीची