तू ही रे माझा मितवा - 29

  • 9.4k
  • 4.1k

#तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_२९ {This is a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.}रिशीला पहिला ड्राफ्ट सबमिट करतांना,ऋतूला प्रचंड टेन्शन आलं होतं.तिने ऑफिसला आल्यावर सगळ्यात अगोदर,भीतभीतच त्याच्या हातात तो रिपोर्ट दिला. त्याने तो ठेवून घेतला आणि लंचब्रेकनंतर डिस्कस करायला बोलावलं. लंचब्रेकपर्यंत तिच्या मनाची घालमेल चालू होती. ब्रेकनंतर दोन तास झाले तरी त्याने तिला डिस्कशनसाठी बोलवलं नाही म्हणून ती स्वतः त्याच्याकडे गेली. सर,मॅडम बोलायचा इथे प्रघात नसल्याने तिला सिनियरला सरळ