अपराधी

  • 7k
  • 1
  • 1.8k

अनघा थोडी घाबरतच रेस्टोरंट मध्ये शिरली.. जनरली मुलगी बघण्याचा कार्यक्रम घरातच होतं असतो पण.. पण असीमने हट्टाने बाहेरच भेटायचे असं सांगितलं.. आता त्याने सांगितल्यावर माई आढेवेढे घेत तयार झाली.." जपून रहा.. जास्त अघळपगळ बोलत नको बसू.. तो विचारेल त्याचं प्रश्नांची उत्तरे दे.. " माईच्या सतराशे साठ सूचना..तिचा आवडता लॅव्हेंडर कलरचा सलवार कमीज, त्यावर फिक्कटसा मेकअप.. वाऱ्यावर उडणारे केसं सारखे करत ती रिजर्व असणाऱ्या टेबलजवळ गेली.. तिला पहाताच एक राजबिंडा युवक उठून उभा राहिला." हॅलो.. दिस इज अगस्त्य.. आगस्त्य बिराजदार.. " त्याने हात पुढे करत आपला परिचय करुन दिला. अनघाने आपला हात पुढे केला. हस्तांदोलन झाल्या नंतर तो पुढे झाला