लघुकथाए - 8 - वर

  • 6.8k
  • 1
  • 2.3k

११ वर रामच्या वडलांचा अचानक ह्रदयविकाराने मृत्यू झाला आणि रामचं कुटूंब दु:खाच्या खाईत लोटलं गेलं. राम तर पार मुळापासून हादरला. काहीच वेळापूर्वी आपल्या बरोबर बसून हसत खेळत नाश्ता करणारे आपले बाबा, अचानक या जगातून नाहीसे झाले. याला काय अर्थ आहे? असं कसं चालेल? काहीतरी तोडगा काढायलाच हवा. मग रामने सगळे जुने ग्रंथ धुंडाळायला सुरवात केली. कसून तपास सुरू केला. वाचनाचा सपाटा लावला. आणि शेवटी त्याला एक संदर्भ सापडला. खात्रीलायक उपाय. अतिशय अवघड, पण खात्रीचा. रामने सर्व पूर्वतयारी केली. व त्याने साधनेला सुरवात केली. घरच्यांना रामचा जिद्दी स्वभाव चांगलाच परिचयाचा होता. त्यामुळे कोणी काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता. पाहता पाहता