एका राजाची (रिटायर्ड) गोष्ट

  • 10.8k
  • 3.1k

गोष्ट एका राजाची ( रिटायर्ड ) एक राजा होता. तसा काही खूप प्रख्यात वगैरे नाही पण राजा छोटा मोठा काही नसतो राजा फक्त आणि फक्त राजा असतो,त्याचे जाच त्याच्या प्रजेलाच माहिती. हा राजा काही वारसा मिळालेला राजा नव्हता. त्याच लग्न झालं,तिला राणी व्हायचं होतं.ती लग्नानंतर राणी झाली म्हणून हा राजा झाला. लग्नानंतर तो तिला आपले पराक्रम म्हणजे त्याचा सम्राट (boss ) कसा त्याच्यावर मोठ्या मोहिमा(projects )साठी पूर्णपणे अवलंबून आहे. त्याने कशा चतुर्याने इतर राजांना सभेत (management meetings ) निरुत्तर केल आणि त्याचे सरदार(subordinates)कसे त्याच्या control मध्ये आहेत इत्यादी पराक्रम ऐकवायचा. आणि राणी त्याच्या महतीत पूर्णपणे दंग होऊन जायची. ती महत्वाकाक्षी