आधार

  • 7.7k
  • 2.7k

आधार गेल्या आठवडाभरात ट्रेनिंग आटोपून मी संध्याकाळीच ट्रेनिंग सेंटरवरून सांगली गाठली आठवडाभरात मी एवढा कंटाळलेला होतो,की आणखी एक रात्रसुध्दा ट्रेनिंग सेंटरवरच्या बोर्डिंगमध्ये काढण्याची माझी इच्छा नव्हती. मी बस स्टाॅडवर पोहचलो तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते. थोडंफार जेवून मिळेल त्या गाडीने मला सावंतवाडी गाठायची होती. त्यामुळे मी बसस्टॅडसमोरच्या हाॅटेलमध्ये जेवलो.तसाच घाई गडबडीत पुन्हा बसस्थानकावर आलो. गाडीची चौकशी केली तेव्हा कळले की सावंतवाडीला जाणारी गाडी साडेअकरा वाजता होती आता कुठे नऊ वाजले होते. दोन-अडीच तास गाडीची वाट पहावी लागणार होती. आधिच मी त्या निरस ट्रेनिंगमुळे कंटाळलो होता. त्यामुळे गाडी उशिरा येणार हे ऐकून मी वैतागलो. पण गप्प बसण्याखेरीज दुसरा कोणताच उपाय नव्हता. मी तिथेच