विरह

  • 6k
  • 2.1k

केदार हॉटेल ओरियंटल प्लाझाच्या रुम नंबर 307 मधून बाहेर पडला तेव्हा रात्रीचे 9:30 वाजले होते. गेल्या काही दिवसात कामाच ओझ वाढल्यामुळे तो थकला होता. त्यात आज ठरलेल्या वेळेत समोरचा क्लाईन्ट नाही आला याचा त्याला राग होता. वैयतागत त्याने आपला कोट उतरला. टाय ढिली करत गळ्यावरच शर्टाच बटन काढल आणि तो स्वतःशीच पुटपुटत होता. असल्या लोकांना दुसऱ्याच्या वेळेची किंमतच नसते. साला यांच्यासाठी थांबा. काय हव नको ते बघा. ऐ वन प्रेझेन्टेशन करा. डील करा. नाहीच झाल तर बाॅस आहेच आपली मारायला तयार. गेल्या तीन वर्षात असे खुप सारे प्रसंग आले, खूप सार्‍या लोकांशी संपर्क झाला. पण समोरच्या कंपनीचा येवढा दिरंगाई आणि