भेट तुमच्या आमच्यातल्या कृष्णाची

  • 6.5k
  • 2.2k

गर्दीतुन वाट काढत ती कशीबशी आत शिरली. एरवी मजेनं प्रवास करणारी ती आज शांतच होती. खरंतर तिची आतल्या आत घुसमट होत होती. एकीकडे आईबाबांना द्याव्या लागणाऱ्या कारणांची जुळवाजुळव करणं चालू होत. सामोसा.... वडा... इडली... असे आवाज आणि निरनिराळे वास तिच्या नाकात शिरत होते. एरवी हवेहवेसे वास आज नकोसे झाले होते. त्याला भेटल्यापासूनच्या सगळ्या घटना आठवतं होत्या. त्याचा चेहराही डोळ्यासमोर नको होता पण.... सारखा तोच आठवतं होता त्याचे ते शब्द पुन्हा पुन्हा घाव घालत होते. का? काय? कशासाठी? कसलाच विचार तिला नको