गूढ (भयकथा)

  • 9.4k
  • 2
  • 3.2k

पुरातन व आगळ्या-वेगळ्या वस्तू गोळा करण्याचा माझा छंद अगदी काॅलेज जीवनापासूनचा आहे. गेल्या पंधरा वर्षात मी अश्या खूप वस्तू गोळा केल्यात.त्यात जुनी नाणी,शिवकालीन हत्यारे,दगडांच्या व लाकडाच्या कोरीवमूर्त्या,उत्कृष्ट कलाकुसर असलेली भांडी ,तबके अश्या बर्याच वस्तू होत्या. काही जुनी कागदपत्रे-दस्तएवज जे संस्कृत,मोडी व पाली भाषेत होते. या कागदपत्रांचं भाषांतरे मी मराठीत तज्ञांकडून करून घेतलीत. या खटाटोपात बराच पैसा खर्च झाला होता. बरीच धावपळ झाली होती. शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला होता. पण म्हणतात ना हौसेला मोल नसत म्हणून! माझ्या मित्रांच्या सल्ल्यानुसार या सारख्या वस्तूंची योग्य जोपासना व्हावी म्हणून मी एक वस्तूसंग्रहालय बनवलय. या छोट्याशा संग्रहात मी जमवलेल्या सर्व वस्तू अत्यंत