अन्वयार्थ

  • 5.1k
  • 1.5k

अन्वयार्थमाधवने उशीवरचा कागद उचलला. अक्षर कल्याणीचे होते.त्याने वाचायला सुरुवात केली: प्रिय, हे लिखाण हातात असेल तेव्हा- मी तुमच्याजवळ नसेन. हे सारे वाचल्यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल? हे बघण्याची किंवा ऐकण्याच धाडस माझ्यात नाही. गेल्या कित्येक वर्षात ह्रदयात दडवून ठेवलेलं एक काळं सत्य. त्यामुळे झालेली घुसमट---आलेला ताण असह्य झालाय. खर म्हणजे हे मी पूर्वीच सांगायला हवं होत. अगदी आपल्या लग्नापूर्वी---! पण मला ते धैर्य झाल नाही---- किंवा मला ते करू दिल गेल नाही. गेली पंचवीस वर्षे हा गुंता असाच घेवून मी जगत राहिले. आयुष्य म्हणजे एक गुंतावळच आहे .नाही का? एखादी गाठ सोडवायला जावं आणि आणखी चार गाठी बसाव्या तसच---! पण