राधा - रंगा - 3 - अंतिम भाग

  • 5.7k
  • 2.3k

३. देवीची जत्रा दोन आठवड्यांवर आली होती. संत्याने बैलांकडून चांगला कसून सराव करून घेत होता. सातारचा त्याचा मावसभाऊ मावशीला घेऊन आला होता. बारामतीला मोठ्या डॉक्टरांकडे दाखवायचं होतं. चार पाच दिवस इथेच असल्यामुळे संत्याने त्याच्याकडून बैलांचा सराव करून घेतला होता. त्याचा मावसभाऊ सातारच्या निंबाळकरांच्या शर्यतीच्या बैलगाडीवर ड्रॉयव्हर होता. साहजिकच त्याला शर्यतीच्या सगळ्या खाचाखोचा माहिती होत्या. त्याने निंबाळकरांचा बैलगाडा सलग तीन वर्षे जिल्ह्यात पहिल्या नंबराने जिंकण्याचा विक्रम केला होता. चार पाच दिवस त्याने बैलांचा आणि संत्याचाही सराव करू घेतला. त्याने संत्याला शर्यतीच्यावेळी लक्षात ठेवण्यासारख्या खूप गोष्टी सांगितल्या. बैलांना मारायचं किंवा दारू पाजायची नाही. टोच्या लावायचा किंवा शेपटी पिरगळायची नाही. छकड्याची चाकं चांगलं