गुंजन - भाग ९

  • 6.3k
  • 3.6k

भाग ९.मागील भागात:- "सॉरी" तो एवढंच बोलतो. पण गुंजन मात्र , चिडूनच गॅलरीत निघून जाते. तिला भयंकर राग आला होता त्याच्या बोलण्याचा. हे त्याला कळून चुकत. मग तो देखील, तिच्या मागे निघून जातो. आतापासून पुढे:- गुंजन गॅलरीत उभी राहते आणि रडायला लागते. वेदच बोलणं तिला जिव्हारी लागलं होतं. कारण आजवर वेदसाठी ज्या फिलिंग तिच्या मनात निर्माण झाल्या होत्या. त्या अजूनपर्यंत इतर कोणत्याही मुलाला पाहून झाल्या नव्हत्या!! वेदच्या स्वभावामुळे ती हळूहळू त्याच्या प्रेमात पडत होती. पण अजूनही तिने कबूल मात्र तोंडाने त्याला केले नव्हते. त्यामुळे वेदला तिचं मन कळत नव्हतं. आता देखील मस्करीत तो बोलून गेला. पण त्याच्या या बोलण्याने ती