गुंजन - भाग १८

  • 6k
  • 3.1k

भाग १८. काल रात्रभर गुंजन मंगळसूत्र ओवत बसली होती. त्या नादातच ती मध्यरात्री कधीतरी झोपून गेली. सूर्याची कोवळी किरणे तिच्या रूमच्या खिडकीतून आतमध्ये प्रवेश करून तिची रूम प्रकाशमय करतात. तसं त्या प्रकाशाने तिला जाग येते. गुंजन डोळे किलकिले करत आळस देते आणि भानावर येत आपल्या हातातील मंगळसूत्र पाहून भलतीच आनंदी होते. कारण ते मंगळलसूत्र तिने पूर्णपणे ओवून पुन्हा आधीसारखे केले होते. जणू काहीतरी मोठं अस तिने केले? अस तिला वाटत होतं. ती पटकन त्या मंगळसूत्रावर स्वतःचे ओठ टेकवते आणि तसच ते स्वतःच्या गळ्यात घालते. "माझं मंगळसूत्र बनल. बर झाल!! मी काल रात्री किती घाबरली होती त्यात वेद पण कॉल उचलत