गुंजन - भाग २६

(2.7k)
  • 10.1k
  • 5.1k

भाग २६. गुंजनच सेमी फिनाले जवळ असल्याने ती खूपच स्वतः वर मेहनत घेत होती. कारण फिनालेला पोहचण्यासाठी तिला या पायरीवर चांगला परफॉर्मन्स करायचा होता. मगच ती शेवटच्या ठिकाणी पोहचणार होती. या कारणाने ती मेहनत घेत होती. वेद सोबत बोलणे देखील तिचे कमी झाले होते. पण काहीतरी मिळवायच होत तिला ते सुद्धा वेदसाठी त्यामुळे ती मनाची समजूत घालत असायची!! शेवटी सेमी फिनालेचा दिवस उजाडला. सगळीकडे या शो ची बरीच पब्लिसिटी करण्यात आली होती. महाराष्ट्रीय लोक तर आपली कोणीतरी स्पर्धेत आहे? हे जाणून तो शो पाहत असायचे. त्यात गुंजनने तिच्या डान्सच्या अदांनी बऱ्याच लोकांवर भुरळ पाडली होती. तिची स्टाईल एकदम युनिक असायची.