रिमझिम धून - ६

  • 4.8k
  • 1
  • 2.4k

'तिला ओरडून ओरडून त्याला सांगावं असं वाटत होत. 'लहानपणी एवढ्या आठवणी, एवढे क्षण एकत्र घालवून, आता कसा काय विसरु शकतोस तू मला? मला शोधण्याचा प्रयत्नही केला नाहीस? का? कधी आयुष्यात भेटावसं पण वाटलं नाही, का? मी मात्र तुला शोधत असायचे. वेळ मिळेल, आठवण येईल तेव्हा तुझी माहिती काढत राहायचे. हा माझे सगळे प्रयत्न अयशस्वी झाले. पण तू ... तू अधिकारी होतास ना? तू कसेही मला शोधून काढू शकला असतास. मुळात इच्छा असायला पाहिजे ना. तुला तर मी आठवत पण नसेन, तू शोधणार काय म्हणा. असो आपण असे अनोळखीच बरे आहोत.'  तो समोर झोपलेला होता, आणि जुई आपल्याच विचारांच्या धुंदीत बडबड करत