काय नाते आपले? - 16

  • 5.7k
  • 1
  • 3.2k

आणि फायनली आज अभिमित च लग्न होत...!! लग्न थोडं वेगळ्या पद्धतीने होणार होत....!! त्यांचे काही फॅमिली फ्रेंड्स आणि नातेवाईकांन च्याच उपस्थितित होणार होत..मितु तयार व्हायला गेली...!! या वेळेस तिला खूपच सुंदर तयार केली होती.. थोडा हेवी मेकअप केला होता त्यात पन ती खूप सुंदर वाटत होती.....तिला मस्त रेड कलर चा घागरा घातला होता...!!मितु आरशात पाहत होती , तिला तिच्या आधीचा लग्नाचा दिवस आठवला , तेव्हा ती किती रडत होती आणि आता?? आता पहिल्यासारखी काहीच सिच्यूएशन न्हवती पण तरी ती थोडी घाबरलेलीच होती...!! अचानक मनात आल कि हे लग्न करू कि नको...?? पण माझं प्रेम आहे अभी वर मी करेल लग्न