स्वार्थपण एवढं खराब?

  • 2.3k
  • 807

स्वार्थीपणा ; एवढा खराब? स्वार्थपण.......माणसाला खात असतं त्याचं स्वार्थपण. स्वार्थपण केल्यानं माणसाचा विकास होतो. विकास नाही होत असं नाही. स्वार्थी व्यक्तींजवळ संपत्ती अगाढ वाढू शकते. तो चार पाच इमारती सहज बांधू शकतो. वाटल्यास स्वार्थी माणूस कितीतरी पुढेही जावू शकतो पैशानं व मालमत्तेनं. परंतु संबंधानं तो माणूस मागेच राहतो. कोणीही त्याचेशी व्यवहार करु पाहात नाहीत. म्हणतात की तो व्यक्ती स्वार्थी आहे. कोण त्याला मदत करणार. अलीकडे समाजात असाच स्वार्थ वाढत आहे. तो एवढा वाढत आहे की त्या स्वार्थी माणसाला आपण काय करतो हेच दिसत नाही. शिवाय आपल्या हातून कोणती चूक होते हेही दिसत नाही. तो चुकांवर चुका करीत जातो व फसतो.