सायलेन्स प्लीज - प्रकरण 14

  • 2.1k
  • 1.1k

प्रकरण 14 पाणिनी ने खोपकर च्या घराची बेल दाबली.ती दाबताच क्षणी इन्स्पे.होळकर ने दार उघडले.पाणिनीच्या चेहेऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. “ कामावर फार लौकर हजर झालास काय आज? ” त्याला खवळवण्याच्या हेतूने पाणिनी म्हणाला.. “ ही लौकर ची वेळ आहे आणि मी कामावर आहे.” इन्स्पे.होळकर ने उत्तर दिलं. “ काय हवंय तुला इथे? ” “ माझ्या केस च्या दृष्टीने मला साक्षीदारांना प्रश्न विचारायचेत आणि हा परीसर जरा नजरेखालून घालायचाय. तुझी काय हरकत? ” पाणिनी म्हणाला.. “ सरकार पक्षातर्फे साक्षीदारांना समन्स काढलं गेलंय तुला त्यात काही लुडबूड करता येणार नाही.” इन्स्पे.होळकर म्हणाला. “ मी काही छेड छाड करणार नाहीये , फक्त प्रश्न