मिनू

  • 1.5k
  • 3
  • 534

"ए मामी .. बघ ना हे काय " ..छोट्या मिनूचा आवाज बागेतून येत होता... 3 वर्षाची मिनू गोगलगायी समोर बसली होती ... "ए मामी .. अग इकडे ये ना लवकर" मिनू पुन्हा ओरडली. "काय कटकट आहे" जया तिच्या लॅपटॉप वर काहीतरी काम करत होती . तिने अजिबात प्रतिसाद दिला नाही... मिनू तिच्या इवल्या हातांवर ती गोगलगाय घेऊन थेट जयाच्या बेडरूम मध्ये आली.. तिचे हात पाय सर्व मातीने भरले होते..तिच्या त्या अवताराकडे पाहून जयाला खूप संताप आला. " अग कार्टे मघाशीच मी तुला स्वच्छ अंघोळ घातली ना .. तू पुन्हा घाण झालीस." असं म्हणून तिला खेचतच तिने बाथरूम मध्ये न्हेलं. "पुन्हा