"पंधराच दिवस?" अनिताने विचारलं."हॊ पंधराच!" तन्मय म्हणाला."आपला हेतू शुद्ध आहे. प्रामाणिकपणे आपण मुलं शिकवतो आहोत. आपलं कामं सुरळीत चाललंय. ही मुळावर घाव घालणारी अडचण आपल्यालाच का आलीये तन्मय? काय करायचं आता?" अनिता खूप दुःखी झाली होती."ही वास्तू मी वाचवणार अनिता. ही नुसती इमारत नाही. माझ्या आईचं मंदिर आहे. तिचं स्वप्नं आहे. असं तुटून देणार नाहीये मी ते. करतो काहीतरी. " असं तन्मय तर म्हणाला होता पण त्याला तरी कुठं माहित होतं की तो काय करणारे.बँकेकडून घेतलेल्या कर्जावर त्याने त्याच्या राहत्या घरावर आणखी दोन मजले चढवले, सुसज्ज वसतिगृह बांधून त्याने घरापासून काही अंतरावर असणाऱ्या एका रेड अलर्ट वस्तीमध्ये जन्मलेल्या मुलांना राहून