भगवंत आणि भक्त

माझी ही कथा आहे भक्तआणि भगवंत यांच्या अपार प्रेमाची..     मी अगदीच १८वर्षा ची असताना आमच्या समोरच एक आजोबा राहायचे.... त्यांचं वय खूपच झालं होतं... वयाच्या मानाने त्यांना आता दिसायला कमी झालं होतं... थोडासा हळूहळू चालत येऊन ते आपल्या बागेत बाहेर बसायचे... आणि मलाही ते आजोबा खूप आवडायचे म्हणून मी त्यांच्याजवळ जाऊन गप्पा मारत बसायचे... रोज थोडं का असेना त्यांच्याशी बोलल्याशिवाय माझा वेळ जायचा नाही...आजही मी त्यांना भेटायला गेले तर आज ते खूपच उदास होते... मी विचारलं "आजोबा काय झालं," तर ते म्हणले काही नाही,मी म्हणालो,"आजोबा खोटं नका बोलू मला माहिती आहे तुम्ही आज नाराज आहात". तुम्ही रोज माझ्याशी किती